उमेदवार पदवीधर मतदारांचे हात जोडून करत आहेत राम राम....मतदार विचारत आहे अहो पदवीधर संघाचे आमदार काय काय केले काम....?

उमेदवार पदवीधर मतदारांचे हात जोडून करत आहेत राम राम....मतदार विचारत आहे अहो पदवीधर संघाचे आमदार काय काय केले काम....?

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: ४१ उमेदवार रिंगणात; सुशिक्षित मतदार विचारत आहेत जाब, 

​


परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी): विधानपरिषदेचा 'पदवीधर मतदारसंघ' हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील एक अत्यंत सुविद्य व वेगळा प्रयोग आहे. समाजातील उच्चशिक्षित वर्ग, सुशिक्षित तरुण, व्यावसायिक, शिक्षक आणि पदवीधरांच्या विशिष्ट अडीअडचणींना थेट विधिमंडळाच्या पटलावर वाचा फोडण्यासाठी या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. ​बेरोजगारांचे प्रश्न, एमपीएससी (MPSC) व युपीएससी (UPSC) परीक्षांमधील घोळ आणि विलंब, ​शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण, वाढत्या फी आणि अनुदानित-विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांचे प्रश्न, ​सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, ​पदवीधरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून धोरणात्मक निर्णय व कायदे करून घेणे ही या मतदारसंघातील आमदारांची प्राथमिक आणि महत्त्वाची जबाबदारी असते. ​

छत्रपती संभाजी नगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा (Constituency No. 05) रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या जागेसाठी तब्बल ४१ उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उभे ठाकले आहेत. आगामी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत या हाय-व्होल्टेज निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. सर्वच पक्षांचे व अपक्ष उमेदवार पदवीधरांच्या दारी जाऊन "मलाच मत द्या," अशी आळवणी करत असले, तरी सुजाण मतदार आता जुन्याच मुद्यांवर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

यांदला निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे  आणि प्रत्येक उमेदवार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत असला, तरी यंदाचा सुशिक्षित मतदार मात्र कमालीचा आक्रमक झाला आहे. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आणि राजकीय पक्षांना मतदार थेट जाब विचारत आहेत की, "गेल्या काळात पदवीधर मतदार संघाचे आमदारने नेमके काम काय केले? ते कोणासाठी केले? पदवीधरांची  प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित का आहेत?"

​पदवीधरांच्या मते, निवडणुका जवळ आल्यावर केवळ आश्वासनांची आतीषबाजी केली जाते; पण सभागृहात पदवीधरांच्या समस्यांवर जितक्या आक्रमकपणे आवाज उठायला हवा होता, तितका तो उमटला नाही. बेरोजगारीचा प्रश्न असो वा रखडलेल्या नोकरभरतीचा, आमदारांनी विधिमंडळात कोणती ठोस कायदेविषयक पावले उचलली, असा प्रश्न आता सुशिक्षित पदवीधर मतदार वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त