मनपा निवडणूक करीता निवडणूक आयोग द्वारा अधिकाऱ्याच्या नियुक्ती

मनपा निवडणूक : प्रत्येकी सहा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त व मुख्याधिकार्‍यांच्या आयोगाद्वारे नियुक्त्या : निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची आचार संहिता कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती

  परभणी,दि.15(टिळक रत्न प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता या जिल्ह्यातील प्रत्येकी सहा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त व सहा मुख्याधिकार्‍यांच्या राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांची आचारसंहीता कक्षप्रमुख तर मनपाचे मुख्य लेखापरिक्षक यांची निवडणूक खर्च कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

            महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर हे निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. तर निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी या आचारसंहीता कक्ष प्रमुख म्हणून व मनपाचे मुख्य लेखा परिक्षक डॉ. श्रीरंग भूतडा यांची निवडणूक खर्च कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त  रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभना देवी जाधव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सोनपेठ येथील तहसीलदार सुनील कावरखे, मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश गाजरे व सोनपेठ तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नटराज रंग मंदिर परिसरातील प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत 1, 2 व 7 करीता हे चार अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

           गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर  यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर गंगाखेड येथील तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे, गंगाखेड येथील मुख्याधिकारी जयंत सोनवणे, व गंगाखेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण मंडपम परिसरातील प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत 3, 4, 5 व 6 करीता हे चार अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

           परभणीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांची  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर परभणी येथील तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे व परभणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा कार्यालयांतर्गत प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत 8, 9 व 14 करीता हे चार अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

             सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सेलू येथील तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पालमचे मुख्याधिकारी युवराज पौळ व सेलू उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बी. रघुनाथ सभागृह येथून प्रभाग क्रमांक 10, 11 व 13 करीता हे चार अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती विद्या मुंढे  यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर मानवत येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे व मानवत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संजय खिल्लारे यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेंतर्गत महापौर कक्षातील मुख्यालयातून प्रभाग क्रमांक 12, 15 व 16 करीता हे चार अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज