प्रधाममंत्री गरीब कल्याण योजना- एस एम एस प्रमाणे निर्धारित केलेल्या दिवशीच पैसे काढण्यास यावे


महिला खातेदारांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या
दिवशीच बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी यावे

निर्धारित दिवसात जे खातेदार पैसे काढण्यासाठी येणार नाहीत त्या खातेदारांनी 15 एप्रिल नंतर बँक/ग्राहक सेवा केंद्र/ ATM मध्ये जाऊन पैसे काढावेत

 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे 
शासन आदेशानुसार प्रधान मंत्री जनधन योजनेंतर्गत उघडलेल्या महिलांच्या खात्यामध्ये प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रु ५००/- जमा करण्यात येत आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिला खातेदारांना 3 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंतचा वेळ दिलेला असून प्रत्येक निर्धारित दिवशी बँक खात्याचा शेवटचा क्रमांक  दर्शवलेल्या खातेदारांनी त्या तारखेस बँक शाखेत, ग्राहक सेवा केंद्रात अथवा ATM  मध्ये  येऊन पैसे काढावेत असे आवाहन करण्यात आले आहे
ज्यांचा खात्याचा शेवटचा क्रमांक खाली दिलेल्या तारखेसमोर दाखविलेला आहे फक्त त्याच महिला खातेदारांनी त्या तारखेस शाखेत/ ग्राहक सेवा केंद्र / ATM मध्ये यावे-
1)दिनांक ०३/०४/२०२० ला खात्याचा शेवटचा क्रमांक  - ० आणि १.
2). ०४/०४/२०२० ला खात्याचा शेवटचा क्रमांक  - २ आणि ३
3). ०७/०४/२०२० ला खात्याचा शेवटचा क्रमांक  - ४ आणि ५
4). ०८/०४/२०२० ला खात्याचा शेवटचा क्रमांक  - ६ आणि ७
5). ०९/०४/२०२० ला खात्याचा शेवटचा क्रमांक  - ८ आणि ९
      फक्त ज्या ताराखेसमोर जे खाते क्रमांक आहेत त्याच महिलांनी पैसे काढण्याकरिता बँक/ग्राहक सेवा केंद्र/ Atm* मध्ये येऊन सहयोग करावा जेणे करून शासनास आणि आपणास सहकार्य करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मदत होईल. कोरोना व्हायरस प्रतिबंध नियमांचे पालन करावे. स्वतः आणि दुसऱ्यामध्ये १ मीटर अंतर ठेवावे . तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा,असे  शासनामार्फत करण्यात येत आहे.
       दर्शिवलेल्या तारखेला जे लाभार्थी येणार नाहीत त्यांना १५ एप्रिल २०२० नंतर पण ATM/ग्राहक सेवा केंद्र/ बँक शाखेत येऊन पैसे काढता येतील, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त