गॅस वितरण कर्मचारी व उज्जवला योजनेतील गॅस ग्राहक यांना सुविधा..तर.. यामहिन्याचा गॅस 62 रुपयांनी स्वस्त झाला


गॅस वितरण करणारे कर्मचारी (डिलिव्हरी बॉय) व उज्जवला योजनेतील गॅस धारक ग्राहक यांचे करीता गॅस किंपनी द्वारा सुविधा प्रदान करण्याची घोषणा.
परभणी(प्रतिनिधी):- सर्व गॅस वितरण प्रणालीत कर्मचारी जसे की शोरूम कर्मचारी डिलिव्हरी बॉय मेकॅनिक ट्रक ड्राइवर हे सर्व जीवनावश्यक वस्तू गॅस चा स्वतःचा जीव जोखिममध्ये टाकून नागरिकांना घरपोहच निस्वार्थ सेवा प्रदान करत आहेत ह्या त्यांच्या जोखमेची दखल सर्व गॅस कंपणीने घेतली असून त्यांनी अशा सर्व कर्मचाऱ्यांना 5 लक्ष रुपयांचा विमा संरक्षण देण्याचे घोषित केले आहे.
त्याच बरोबर उज्जवला योजनेतील सर्व गॅसधारक नागरिकांना येत्या 3 महिन्यासाठी गॅस मोफत वाटप करण्यात येईल यामध्ये पहिल्या गॅस घेतल्या नन्तर दुसरी रिफिल घेण्याचे अंतर हे 15 दिवसांचे करण्यात आले आहे. यामुळे सदरील उज्जवला योजनेतील ग्राहकाना आपल्या नोंदनिकृत मोबाईल क्रमांकावरून गॅस बुक करावा लागेल .यामध्ये सर्व ग्राहकांनी मोबाईल बुकिंग द्वारे गॅस बुक करून सदरील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गॅस कंपनीने केले आहे
तसेच कोरोना 19 चा संक्रमण थांबवण्यासाठी रोख रक्कम हातात न देता गॅस धारक ग्राहकांनी शक्यतोवर ऑनलाईन पेमेंट प्रणालीचा वापर करावा. गॅस वितरक ग्राहकांना घरपोहच सेवा देण्यासाठी तत्पर आहेत याचा सर्व गॅसधारक ग्राहकांनी लाभ घ्यावा.
गॅस घरपोहच मिळवण्याकरिता ऑनलाईन बुकिंगचा वापर करावा HPCL-9222201122 IOCL-7588888824 BPCL-7710955555 तसेच डीजिटल पेमेंट HPPay,Bharatgasapp,Phone pay,Amazon,Umang app व इतर चा वापर करून पैसे द्यावेत
तसेच गॅस सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे नागरिकांनी विनाकारण साठेबाजी करू नये 
असे आवाहन एच पी गॅसचे विक्री अधिकारी अभय अवचार यांनी कळवले आहे

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज