मरकज येथे गेलेलं तसेच मरकज मधून आलेले यांच्या संपर्कात जे कोणी आले आहेत सर्वांनी तपासणी करा....अन्यथा

मरकज येथे गेलेलं तसेच मरकज मधून आलेले यांच्या संपर्कात जे कोणी आले आहेत सर्वांनी तपासणी करा....अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जा..!

निजामुद्दीन दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमास देशातील विविध भागातून लोकांनी हजेरी लावली होती सदरील कार्यक्रमात सहभागी शेकडो लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमास मरकज येथे गेलेल्या पैकी  जो कोणी व्यक्ती आपल्या गावात आला असेल या व्यक्तींनी स्वतःहून समोर येऊन आपली माहिती प्रशासनास कळवावी किंवा आपल्या कोणाच्या निदर्शनास जर कोणी असा व्यक्ती आढळून आल्याचे दिसल्यास प्रशासनास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी 02452-223458
तसेच आशिष आहेर संपर्क प्रमुख जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी - 9689997113 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून काळवावे.त्याच बरोबर अश्या त्या स्थळावरून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वतः समोर येऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी....जर अश्या प्रकारे गावात येऊन माहिती न काळवणारे व तपासणी न करून घेणारे अश्या सर्व लोकांवर सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाईल याची सर्वांनी दखल घ्यावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

परभणी RTO कार्यालयात ACB चा दणका! मोटरसायकल नावावर करण्यासाठी लाच घेताना महिला लिपिकासह दोघे रंगेहात जाळ्यात!

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

सेलूमध्ये FDA ची मोठी कारवाई! बेकरीवर छापा टाकून १५,६०० रुपयांचा 'ब्रेड केक'चा साठा जप्त