तबलिकी जमातीचे मुस्लिम पेशंट लोकांनी हे वर्तन त्वरित बंद करा ...अन्यथा...
डॉक्टरांच्या अंगावर थुंकत आहेत ‘तबलीगी जमात’चे पेशन्ट !
विलगीकरण केंद्रात तबलीकी मुस्लिम पेशंट करतात उद्धट वर्तन आणि अवाजवी मागण्या
‘कोरोनाग्रस्तांच्या थुंकीतून साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो’, हे ठाऊक असतांना हे तबलिकी जर जाणीवपूर्वक असे थुंकत असतील, तर त्यांचा हा ‘कोरोना जिहाद’ म्हणायचं का ? यापूर्वीही त्यांनी बसमधून त्यांना नेत असतांना रस्त्यांवर थुंकण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात घेतले पाहिजे !
याविषयी आता पुरोगामी, निधर्मीवादी, काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट आदी राजकीय पक्ष आणि त्या पंथाचे धर्मगुरु काही बोलतील का ? कि ‘हे तबलीकी मुस्लिम जे काही करत आहेत, हे योग्यच आहे’, असे त्यांचे यावर मत काय आहे ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – येथील निजामुद्दीन मरकज मशिदीमधील १६७ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांपैकी ९७ जणांना एका शाळेच्या वसतीगृहात ठेवण्यात आले आहे, तर उरलेल्या ७० जणांना आर्.पी.एफ्.च्या (‘रेल्वे प्रोटेक्शन फोर्स’च्या) बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे. तथापि हे लोक कोणत्याही नियमांचे पालन न करता वैद्यकीय कर्मचार्यांशी उद्धटपणे वागत असून सर्वत्र थुंकत आहेत. इतकेच नाही, तर ते त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावरही थुंकत आहेत, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.
दीपक कुमार पुढे म्हणाले की, हे लोक इमारतीच्या भागात फिरत आहेत. ते खाण्याच्या अवाजवी मागण्या करत आहेत. याविषयी देहलीच्या दक्षिण पूर्व जिल्हाधिकार्यांना सांगण्यात आले आहे. येथे आवश्यक सुरक्षाव्यवस्था वाढवावी अन्यथा त्यांना अन्य ठिकाणी हालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विलगीकरण केंद्राच्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दल, देहली पोलीस आणि ‘पी.सी.आर्. व्हॅन’ नियुक्त करण्यात आली आहे.येथील वैद्यकिय सेवा देणाऱ्या लोकांनी अश्या उद्धट वर्तन करणाऱ्या लोकांवर NSA नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे

Comments
Post a Comment