Posts

Showing posts from December, 2025

महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 इंत्र्गत परभणी उदयोन्मुख जिल्हा म्हणून समाविष्ट

Image
महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 इंत्र्गत परभणी उदयोन्मुख जिल्हा म्हणून समाविष्ट - परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याला आली यश परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- प रभणी जिल्ह्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत महत्त्वाचा  निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच प्रयत्न असतो की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. या व्यापक उद्दिष्टामध्ये परभणी जिल्ह्याचाही समावेश व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत. नवीन धोरणांतर्गत झोन–१ मध्ये समावेश झाल्यामुळे परभणीतील गुंतवणूकदारांना विशेष प्रोत्साहन सवलती मिळणार आहेत. तसेच परभणी जिल्हा  “डी+ श्रेणी” मध्ये कायम ठेव...

परभणी मनपा निवडणूक स्वबळाचा नारा थंड एकमेकांच्या साहाय्याने निवडणूक लढली जाणार

महायुती व महाविकास आघाडीतील सर्व मुख्य पक्ष व घटकपक्षासह स्थानिक पक्ष निवडणूक मध्ये सर्वच्या सर्व उमेदवार स्वबळावर उभे करण्यात अपयशी परभणी,दि.18(टिळक रत्न प्रतिनिधी) : महानगरपालिकेंतर्गत 16 प्रभागातील सर्व 65 जागा स्वबळावर लढविण्याची ताकद प्रमुख राजकीय पक्षात, नेतृत्वात नाही, असे दुर्देवी चित्र समोर आले आहे.               स्थापनेपासूनच महानगरपालिकेवर काँगे्रसचे वर्चस्व राहिले आहे. दोन निवडणूकीतून ते सिध्दही झाले. परंतु, आगामी निवडणूकीत काँग्रेस पुन्हा बाजी मारेल, हॅट्रीक करेल, असे चित्र नाही. त्याचे कारणही सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासारख्या भक्कम अशा नेतृत्वाचा काँग्रेस पक्षास सोडचिठी देऊन भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाचा निर्णय काँग्रेसजणांना निश्‍चितच तडाखा देणारा व भारतीय जनता पार्टीस उभारी देणारा ठरला आहे. त्यामुळेच काँग्रेसजणांसमोर सक्षम अशा नेतृत्वाचा व तगड्या उमेदवार निवडीचा यक्ष प्रश्‍न उभा राहीला आहे. ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा देशमुख हे काँग्रेसचे सक्षम व सर्वार्थाने भक्कम असे न...

परभणीसह मराठवाड्यासाठी रेल्वे सुविधांचा विस्तार करा :खासदार संजय जाधव

Image
 परभणीसह मराठवाड्यासाठी रेल्वे सुविधांचा विस्तार करा :खासदार संजय जाधव   परभणी,दि.18(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी, जालनासह संपूर्ण मराठवाडा विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांचे थांबे, अतिरिक्त डबे, नवीन रेल्वे गाड्या, टर्मिनल व्यवस्था तसेच पायाभूत सुविधांचा विस्तार करावा, अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.            खासदार जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची गुरुवार 18 डिसेंबर रोजी भेट घेऊन आपल्या मागण्या संदर्भातील एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्याद्वारे,  गंगाखेड रेल्वे स्थानकावर धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेसला थांबा द्यावा. कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर तसेच पुणे-अमरावती-पुणे रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त कोच जोडावेत. नांदेड-पुणे व नंदिग्राम एक्सप्रेसला मानवत रोड स्थानकावर दोन्ही दिशांनी थांबा द्यावा, तसेच नांदेड-पुणे एक्सप्रेस पूर्ववत पुणे स्थानकापर्यंत चालवावी. निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजर गाडीत शयनयान व थ्री-टायर एसी डबे जोडून सुरक्षा कर्मचार्‍यांची पुरेशी व्यवस्था कर...

मनपा निवडणूक करीता निवडणूक आयोग द्वारा अधिकाऱ्याच्या नियुक्ती

मनपा निवडणूक : प्रत्येकी सहा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त व मुख्याधिकार्‍यांच्या आयोगाद्वारे नियुक्त्या : निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची आचार संहिता कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती   परभणी,दि.15(टिळक रत्न प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता या जिल्ह्यातील प्रत्येकी सहा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त व सहा मुख्याधिकार्‍यांच्या राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांची आचारसंहीता कक्षप्रमुख तर मनपाचे मुख्य लेखापरिक्षक यांची निवडणूक खर्च कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.             महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर हे निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. तर निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी या आचारसंहीता कक्ष प्रमुख म्हणून व मनपाचे मुख्य लेखा परिक्षक डॉ. श्रीरंग भूतडा यांची निवडणूक खर्च कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त  रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभना देवी जाधव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सोनपेठ...

आमदार रत्नाकर गुट्टे परभणी शहर महानगर पालिका निवडणूक यशवंत सेना परिवर्तन विकास आघाडी वतीने उमेदवार रिंगणात उतरवणार

Image
आमदार रत्नाकर गुट्टे परभणी शहर महानगर पालिका निवडणूक यशवंत सेना परिवर्तन विकास आघाडी वतीने उमेदवार रिंगणात उतरवणार   परभणी,दि.16(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कालावधीत सर्वच पक्षाच्या राजकीय पुढार्‍यांसह पदाधिकार्‍यांनी पडद्याआड सातत्याने साटेलोटे करीत महानगरपालिकेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा आरोप करीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मंगळवारी (दि.16) एका पत्रकार परिषदेद्वारे केला. महापालिकेंतर्गत या भ्रष्ट साखळीच्या विरोधात सर्वसामान्य मतदारांना एक सक्षम पर्याय म्हणून यशवंत सेना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडी सर्व जागा लढविणार आहे, अशी माहिती दिली.             परभणी महानगरासमोर अनंत प्रश्‍न उभे आहेत. हे प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर व जटील झाले आहेत. सर्वसामान्य नागरीक या समस्यांमुळे अक्षरशः होरपळून निघाले आहेत. सर्वच स्तरावरील नागरीकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून काडीचीही सुविधा आजपर्यंत मिळाली नाही, अशी खंत आमदार गुट्टे यांनी व्यक्त केली. संपूर्ण शहर बकाल झाले आहे, बहुतांशी रस्ते पूर्णतः उखडले आहेत. नाल्य...

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक -2025 मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान

Image
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक -2025 उद्या मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान *मतदानाची वेळ - सकाळी 7.30 ते सांय. 5.30 या*  मतदानासाठी प्रशासन सज्ज ; मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजवावा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी, दि. 1 डिसेंबर (टिळक रत्न प्रतिनिधी)-- परभणी जिल्ह्यातील 7 नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 या कालावधीत मतदान करता येणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाच अमूल्य हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.  परभणी जिल्हयातील गंगाखेड, जितूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध  करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभुमीवर नगर परिषद क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त  तैनात करण्यात आला आहे.  नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदा...