तेल काढणी युनिट अनुदान तत्त्वावर हवे असेल तर त्वरित अर्ज करा
तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन परभणी दि. 30 (टिळक रत्नप्रतिनिधी) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अभियान सन 2025-26 अभियान अंतर्गत जिल्ह्यात अनुदानावर 1 तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री, उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) साठी लक्षांक प्राप्त असुन प्रत्यक्ष खर्चाच्या 33 टक्के किंवा 9.90 लाख अनुदान देण्यात येणार असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी तेल काढणी युनिटसाठी 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज करण्यात यावेत. तसेच सदर बाबीअंतर्गत परभणी जिल्ह्याकरीता 1 भौतिक लक्षांक असल्यामुळे 1 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडतीव्दारे निवड करण्यात येईल. सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था, सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधि...