टिळक रत्नच्या बातमीचा दणका, विद्यापीठ प्रशासनाने सोडले मौन केला कृषी विद्यापीठातील कक्ष अधिकार्‍याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल... बनावट नियुक्ती पत्र प्रकरण

टिळक रत्नच्या बातमीचा दणका, विद्यापीठ प्रशासनाने सोडले मौन केला कृषी विद्यापीठातील कक्ष अधिकार्‍याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल... बनावट नियुक्ती पत्र प्रकरण



 परभणी, दि. 5 (प्रतिनिधी) ः काही दिवसखाली टिळक रत्न मध्ये विद्यापीठ मध्ये 20 लाख दाम घेऊन दिली नौकरीची ऑर्डर मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते विद्यापीठ प्रशासन ह्याबाबत मौन बाळगून होते शेवटी पाठपुरावा केला गेल्याने विद्यापीठ प्रशासनास सदरील घटने बाबत मौन सोडावे लागले आणि त्यांनी कक्ष अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली 

जेव्हा आमचे प्रतिनिधी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा करत होते तर प्रशासन सुरवातीस असे काही घडलेच नाही , असले घडूच शकत नाही , शेवटी राऊत नावाचा कोणीही व्यक्ती आमचेकडे कामालच नव्हता पण आम्ही ह्याचा पाठपुरावा केला आणि आमच्याकडे माहिती मिळाली की सदरील व्यक्तीला विनापगार कामाला राबविले देखील गेले तेही विद्यापीठ मध्येच मग प्रशासन याबाबत कोणाला पाठीशी घालू पाहत आहे कळायला मार्गच नाही पण शेवटी सत्य बाहेर आलेच प्रशासनाणे कक्ष अधिकारी साखरे यांच्यावर गुन्हा दाखल करून आपले मौन सोडावेच लागले 

याबाबत कारवाई सम्पूर्ण घटना क्रम पुढील प्रमाणे दिसून आला वसंतराव  नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी सहाय्यक या पदाच्या भरती प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या उमेदवारास बनावट नियुक्ती आदेश दिल्याबद्दल कक्ष अधिकारी अविनाश बाळासाहेब साखरे याच्याविरोधात येथील नवामोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कृषी विद्यापीठात 2014 साली कृषी सहाय्यक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू होती. या पदभरती दरम्यान प्रवीण दगडू राऊत (रा. युसूफ वडगाव, ता. केज) यास 200 पैकी केवळ 30 गुण मिळाले होते. त्यामुळे तो उमेदवार परिक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. गुणवत्तेनुसार तो अपात्र असतानासुध्दा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तत्कालीन कक्ष अधिकारी व सध्या बदनापूर कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेले अविनाश बाळासाहेब साखरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता प्रवीण राऊत यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले अन् विद्यापीठाच्या लेटरपॅडवर बनावट नियुक्तीचे आदेश व कागदपत्रे तयार करून ते बनावट आहेत, हे माहित असतानासुध्दा ते खरे म्हणून वापरून विद्यापीठासह राऊत यांची शुध्द फसवणूक केली. दरम्यान, या प्रकरणात कृषी विद्यापीठातील पुरभा कोंडिबा काळे यांनी शनिवारी (दि.पाच) सायंकाळी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अविनाश साखरे यांच्याविरोधात भादंवि कलम 420, 468 व 471 या कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.आलेवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आता प्रश्न आजून निर्माण होतो की जर हे सर्व घडले त्या व्यक्तीने 1 वर्ष विद्यापीठ मध्ये काम सुद्धा केले मग कसे कोणाला दिसले नाही आणि आमचे प्रतिनिधी चौकशीला गेले असता राऊत नावाच्या व्यक्तीचा तेथे काम केले असताना सुद्धा कसा काय कोणाला थांगपत्ता नाही ह्यात आजून दुसरे काही प्रकरण तर नाही ना केवळ 20 लाखच आहेत की आजून दुसरेच काही प्रकरन शिजणार होते ह्याचा सुद्धा लवकरच उलगडा झालाच पाहिजे.... ह्याप्रमाणे बिनपगारी फुल अधिकारी बनून आजून कोण व किती लोक कामाला आहेत ह्याचा सुद्धा मुळात जाऊन तपास झाला पाहिजे..... हे दिसते तसे साधारण प्रकरण नाहीये असाच एकूण प्रकार आहे ..... पोलिसांनी ह्याबाबत कसून व मुळाशी जाऊन तपास करावा खूप काही बोगस प्रकार हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन