कुलगुरू डॉ इंद्रमणी आयएसई शिक्षण सुवर्णपदकाने सन्मानित- केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘प्रा. गजेन्द्रसिंह आयएसएई शिक्षण सुवर्णपदक’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल भोपाळ येथे आयोजित ‘कृषी अभियांत्रिकी नवाचार ५.०’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले सन्मानित. परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थान (सीआयएई) यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त “कृषिसाठी अभियांत्रिकी नवाचार ५.०” या विषयावर आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट योगदानाबद्दल “प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक” (Prof. Gajendra Singh ISAE Education Gold Medal) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान परिषदेच्या समारोप समारंभात दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री मान...