8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली
“गोशाळा प्रकरणात कारवाईसाठी 10 हजारांची मागणी; 8 हजार घेताना पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याला एसिबी ने केले जेरबंद” लाच घेताना पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली अगदी फिल्मी स्टाईल सारखी घटना परभणी, दि. 7 (टिळक रत्न प्रतिनिधी) : तक्रारीवर कारवाई करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धडक कारवाई गंगाखेड येथे करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे ओमकार नगर, गंगाखेड येथील 70 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, ते गोशाळा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने सोनपेठ पोलीस ठाण्यात गोशाळेतून गाय व दोन वासरे जबरदस्तीने नेल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई करण्यासाठी बीट जमादार व पोलीस हवालदार भगवान विठ्ठल मुंढे (वय 54) यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. लाच मागणीची पडताळणी दि. 25 फेब्रुवारी रोजी गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्...