Posts

Showing posts from January, 2026

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या फरकाची रक्कम सरकार कडून महामंडळाला मिळालीच नाही !

Image
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या फरकाची रक्कम सरकार कडून महामंडळाला  मिळालीच नाही ! राज्य सरकारची अब्रू राखण्यासाठी महामंडळाच्या तिजोरीतून वाढीव रक्कमेचे वाटप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला, अर्थ खात्याकडून केराची टोपली! महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस  श्रीरंग बरगे यांचा आरोप! परभणी: (टिळक रत्न प्रतिनिधी) :-  एसटी महामंडळाच्या राज्यभरातील ८५ हजाराहून अधिक  कर्मचाऱ्यांच्या  वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. या निर्णयाला दोन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अद्याप पर्यंत  फरकाची रक्कम सरकारकडून महामंडळाला  देण्यात आली नसून घोषणेची पूर्तता करण्यासाठी व सरकारची अब्रू वाचविण्यासाठी एसटीच्या तिजोरीतून सदरच्या रक्कमेचे वाटप गेले दोन महिने करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आदेश राज्याचा अर्थ खात्याकडून डावलण्यात येत असून परिणामी महामंडळावर  आर्थिक बोजा वाढत असल्याने महामंडळ आर्थिक कचाट्यात ...

श्री परशुराम चषक 2026 संपन्न

Image
 परशुराम चषक 2026 संपन्न स्वा. सावरकर संघ रत्नागिरी ठरला पहिल्या पारितोषिकाचा मानकरी पुणे (टिळक रत्न प्रतिनिधी)-: परशुराम हिंदू सेवा संघाच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील कोद्रे फार्म्स येथे दोन दिवसीय परशुराम चषक 2026 फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात होती. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश सुमंत संपर्कप्रमुख स्वप्निल कुलकर्णी सागर मांडके शहराध्यक्ष शैलेश खोपटीकर आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे विजय शेकदार उपक्रम प्रमुख विवेक लोहारेकर सहप्रमुख किशोर होले आदींची पहिल्या दिवशी उपस्थिती होती तर दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध पत्रकार सुशील कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते अमोल सणस पी टी काळे ओंकार जोशी बाळासाहेब कुलकर्णी प्रसन्न पुराणिक प्रशांत पोमण आदींची उपस्थिती होती. शनिवार 10 जानेवारी व रविवार 11 जानेवारी असे दोन दिवसाचे आयोजन होते शनिवारी पहिल्या दिवशी एकूण राज्यातील विविध शहरांमधून आलेले सात संघ सामने खेळले प्रामुख्याने पहि...