पूजा खेडकर यांना दिलेले आय. ए. एस. पद रद्द करण्याची मागणी
पुजा खेडकर यांना दिलेले आय.ए.एस. पद रद्द करण्याची रुग्ण हक्क संरक्षण समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी परभणी ( प्रतिनिधी ) आज दिनांक 12 जुलै रोजी शहरातील रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यशील असलेली रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने पुजा खेडकर हिने अंशतः दृष्टिहीन आणि मानसिक दृष्टया विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यातून तीला आय.ए.एस. परिक्षेत 821 श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते. त्या आधी तीने एम.बी.बी.एस. केलेले आहे. पुजा खेडकर हीने दृष्टीहीन आणि मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दाखल करुन तीने त्या कोठयातून परिक्षा दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे ब्रेन्च ची पात्रता नसतांनाही तीने खोटे व बनावटी कागदपत्रे दाखल करुन ही दिशाभूल करुन आय.ए.एस. चे पद घेतले आहे. यामुळे जे अपंग आहेत, अभ्यासू आहेत, जे खरोखरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान केलेल आहे, हे पद देशातील नौकरीमधील सर्वोच्च नौकरीचे पद आहे. व यापदाला सगळ्यात जास्त विश्वास व मान आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री यांचा सल्लाग...