परभणीचा भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तू सोनवणे ऐसीबी च्या जाळ्यात
परभणीचा भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तू सोनवणे लाच घेताना ऐसीबी जाळ्यात शासनाकडून पगार मिळतो तरीही लाच का घेतात हें नकळणारे कोडे आहे असे नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो अशा घटेनेमुळे, शासनाने असल्या लाचखोर अधिकारी कर्मचारी लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी )- येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तू सोनवणे यांना एसीबी णे लाच घेताना रांगेहाथ पकडले. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी सन 2004 मध्ये परभणी शहर महानगरपालिका हद्दीत सर्व्हे क्रमांक 303 मध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे. तक्रारदार यांचे प्लॉट करिता नवीन मिळकत क्रमांक देऊन पी.आर. कार्ड बनवून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, परभणी यांनी आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार नवीन मिळकत क्रमांक व पी.आर. कार्ड मिळणे करिता तक्रारदार यांनी उप अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग, परभणी यांचे कार्यालयात दि. 29/11/2023 रोजी अर्ज दिलेला आहे. सदर अर्जावरून काम झाले का नाही, याबाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी आलोसे सोनवणे यांचेकडे विचारणा केली परंतु त्यांना नंतर या असे सांगितले जात होते. ...